जळगाव ;- येथील जिल्हापरिषदेच्या जलसंधारण व सिंचन विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला असून संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी आज दिले . यावेळी पोलीस अधीक्षकांनी सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले . यावेळी प्रमोद सावकारे , अँड.हरीश पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि , जि.प.जळगांव येथील सिंचन विभागातील गौणर्खनिज वाहतूकीचे परवाने व त्याद्वारे शासनाची केलेली आर्थिक लूट, भ्रष्ट्राचार तसेच राजमुद्रेचा गैरवापर या संदर्भात भष्ट्राचार बाहेर काढलेला आहे. त्याबाबत कागदोपत्री पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. .जिल्हाधिकारी यांना सविस्तर माहिती त पुराव्याच्या आधारे दि.२८/०९/२०२० व १२/१०/२०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदरील तक्रार अर्जामध्ये सिंचन विभाग जि.प.जळगांव यांच्यामार्फत जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग व इतर योजनांमध्ये सन.२०१४ ते २०२० या कालावधीमध्ये गौणखनिज रॉयल्टी रक्कम व त्यासाठी बनावट गौणखनिज परवाने, कागदपत्रे तयार करून, बेकायदेशीर राजमुद्रेचा वापर करून कोटयावधी रूपयांचा भष्ट्राचार जि.प.जळगांव यांच्या कार्यालयातील संबंधीत विभागचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत व कटकारस्थान करून भष्ट्राचार केलेला आहे. सदरील तक्रारीबाबत .जिल्हाधिकारी यांनी दि.०३/११/२०२० रोजी सुनावणी घेऊन संबंधोतावर कारावाई करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.२५/११/२०२० रोजी दिलेले आहे परंतू त्याबाबत कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हापोलिस अधिक्षक यांचेकडे सदरचा तक्रार अर्ज सादर करावा लागल्याचे म्हटले आहे . प्राप्त माहितीनुसार गौणखनिज रॉयल्टी रकमेमध्ये कागदपत्रासह कशाप्रकारे संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांनी भ्रष्ट्राचार केलेला आहे याबाबत सविस्तर माहिती व कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे. जिल्हापरीषद जळगांव सिंचन व जलसंधरण विभागातील जबाबदार अधिकारी व ठेकेदार जलव्यवस्थापन व पाणीपुरवठा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावाअन्यथा याबाबत मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका वा रिठ याचिका दाखल करणार असल्याचा इशारा पल्लवी सावकारे यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.







