जळगाव ;- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्स, कक्षसेवक, परिचारिका, परिचारक यांनी पुढाकार घेतला आहे. दिवसभरात ८० जणांनी ‘काेविशील्ड लस टाेचून घेतली. दुपारी गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील यांच्यासह त्यांच्या मातोश्री ८६ वर्षीय गोदावरी पाटील यांनीही लस टाेचून घेतली. आतापर्यंत ५१० जणांनी लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. ऋषीकेष येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, गायत्री पवार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबवण्याचे यशस्वी नियोजन केले.
—————————








