जळगाव ;– खुन्नस दिल्याच्या कारणावरून उमाळा येथे किराणा दुकानासमोर लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील चौघा संशयितांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. मंगळवारी त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. २० जानेवारी रोजी ९ ते ९.३० वाजता उमाळा गावातील गावठाणमधील नामदेव पाटील यांच्या किराणा दुकानासमोर राजू पाटील यांच्याकडे खुन्नसने शेखर नाना पाटील का पाहतो, असे बोलल्याच्या कारणावरुन ८ जणांनी लाकडी काठी, चापटा, बुक्क्यांनी भिमराव पाटील, राजू पाटील व किरण उर्फ भय्या यांना मारहाण केली होती. या प्रकरणी भिमराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन रघुनाथ चव्हाण, भगवान चव्हाण, प्रकाश चव्हाण, शेखर पाटील, शुभम चव्हाण, भारती मोरे, मंगलाबाई चव्हाण व शरद पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ चव्हाण, भगवान चव्हाण, प्रकाश चव्हाण व शेखर पाटील या चाैघांचे जामीन न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.








