नवी दिल्ली –देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगोई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील परशूराम आत्माराम गंगावणे, नामदेव कांबळे, गिरीश प्रभूणे, जसवंतीबेन जमनादास पोपट आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री किताबाने गौरण्यात आले आहे.
पद्मविभूषण :
शिंजो आबे, प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम, डॉ. बेली मोनाप्पा हेगडे, नरिंदर सिंग कपानी, मौलाना वाहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू
पद्मभूषण :
कृष्णन नायर शांताकुमारी, तरुण गोगोई, चंद्रशेखर कांबरा, सुमित्रा महाजन, नृपेंद्र मिश्रा, रामविलास पासवान, केशूभाई पटेल, कल्बे सादीक, राजनीकांत देविदास श्रॉफ, तारलोचन सिंग