जळगाव ;– शहरातील मेहरूण भागात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती . मात्र हा रुग्ण ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता अशा २७ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . या २७ जणांचा आज सकाळी औरंगाबाद येथून आलेल्या तपासणी अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातील सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला आहे .