जामनेर;- जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर काही सत्रा पासून कमी लाभार्थी येत होते.आरोग्य कर्मचारी आशा अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये काही प्रमाणात भीती दिसुन येत होती स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालय लसीकरण केंद्राला भेट सुद्धा दिली होती . या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर.के.पाटील सचिव डॉ. स्वप्नील सैतवाल जामनेर शहर प्रसिटीशनर असोसिएशनचे डॉ.प्रशांत भोंडे,डॉ.चंद्रशेखर पाटील, डॉ.सचिन बसेर यांच्या कल्पनेतून तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दुर व्हावी या उद्देशाने डॉक्टर्स व स्टाफ यांच्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या विशेष सत्रात 100%प्रतिसाद मिळाला डॉ. अमोल शेठ,डॉ.रवींद्र कासट ,डॉ.रमेश पाटील,डॉ.महेश जाधव,डॉ.सीमा पाटील,डॉ.भारती लेले, डॉ.अनिकेत लेले,डॉ.राहुल वाणी, डॉ.सुदर्शना सोनवणे,डॉ.जयंत महाजन,डॉ. अमृता सैतवाल,डॉ.दीपक ठाकूर,डॉ. विवेक जाधव यांच्यासह एकूण ३५ डॉक्टर इतर ६५ लाभार्थ्यां आज व्हक्सीनेटर वनिता जाधव यांनी कोरोना लस दिली.लसीकरण झालेल्या डॉक्टरांना गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन डॉ.राजेश सोनवणे, डॉ. विनय सोनवणे, डॉ.जयश्री पाटील,डॉ.चंद्रशेखर पाटील
डॉ.आर.के.पाटील, डॉ. प्रशांत भोंडे,डॉ.मनोज विसपुते यांच्याकडून गौरवण्यात आले.महिला संघटक मीना ताई तालुका प्रमुख मीना ताई आहे.
——————————







