शिरसोली (प्रतिनिधी) – येथे एका ४५ वर्षीय शेतकऱ्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजता शिरसोली प्र. बो . घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो . येथे शेतकरी रवींद्र सखाराम खलसे (बारी) वय- ४५ हे आज दुपारी ३ वाजता घरी एकटे असतांना घरातील लाकडी साऱ्याला दोरी बांधून गळफास घेतला दुपारी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर आरडा- ओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. दोरी कापून रवींद्र यांना खाली उतरवून तात्काळ जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवींद्रला मृत घोषित केले. रवींद्रने गळफास घेतल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत जळगाव एएमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.







