जळगाव (प्रतिनिधी) – आज मराठा प्रीमियर लीग चे लीग फेरीचे सामने संपून उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना रंगतदार सुरवात झाली.उपउपांत्य पर्ल होजेअरी विरुद्ध प्रबोधिनी या सामान्य मध्ये नाणेफेक पर्ल होजेअरीने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला परंतु या सामान्यामध्ये प्रबोधिनी या संघाने निर्धारित १० षटकात १०६ धावांचे माफक आव्हान ठेवले.पर्ल होजेअरी या संघाने सदर आव्हान ३ गडीच्या मोबदल्यात ११० धावा करून ७ विकेट ने सामना जिंकला.

या सामन्यामध्ये पर्ल होजेअरी या संघाचा विश्वेश देशमुख खेळाडूने २३ चेंडूत ४६ धावा करून सामनावीरचा पुरस्कार पटकाविला.आजच्या दुसऱ्या सामन्यात पाटील बायोटेक व स्नेहल प्रतिष्ठान या २ संघामध्ये झाला. या सामन्यात पाटील बायोटेक या संघाने निर्धारित १० षटकात ६ गडी गमावून १३४ धावांचे स्नेहल प्रतिष्ठान या संघासमोर डोंगर उभारला स्नेहल प्रतिष्ठान संघाने निर्धारित १० षटकात ११५ इतकीच धावसंख्या गाठलीआणि ४ गडी गमावले त्यामुळे दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना पाटील बायोटेक या संघाने १९ एवढ्या धावसंख्येने जिंकला.या संघाचा ज्ञानेश्वर पाटील खेळाडूने १५ चेंडूत २९ धावा आणि २ विकेट घेतल्या तर या खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार पटकाविला.








