अमळनेर;- तालुक्यातील मेहरगाव येथून शेतकऱ्याच्या शेतातून १ लाख २५ हजार रूपये किंमतीची म्हैस व बैल या दोन गुरांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनश्याम भगवान शिंदे (वय-२८) रा. मेहरगाव ता. अमळनेर यांच्याकडे म्हैस व बैलजोडी आहे. त्याचे अमळगाव व पिंगळवाडे गावादरम्यान शेत असून गुरांना शेतातच बांधतात. २१ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात बांधलेले ६५ हजार रूपये किंमतीची म्हैस आणि ६० हजार रूपये किंमतीचा एक बैल असा एकुण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे दोन गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात घनश्याम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे.







