जळगांव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे उदघाटन प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले. हास्य सम्राट ॲङ . अनंत खेळकर यांनी कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफले.


प्रा.माहुलीकर यांनी उदघाटकीय भाषणात मराठी भाषेवर प्रेम करण्याचे आवाहन करुन नव्या शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेला महत्त्व दिले असल्याचे नमूद केले. ॲङ खेळकर यांनी सध्याच्या बिकटस्थितीत हासणे जितके कठीण आहे त्यापेक्षा हसवणे अधिक कठीण असल्याचे सांगितले. प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत व विवेकवान असावे असे सांगून ज्ञान केंद्राचा बिंदू मराठी आहे व तंत्रज्ञानासोबत त्याची जोड द्यावी असे आवाहन केले. प्रा.आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. नेत्रा उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा महाजन यांनी आभार मानले. उद्या पासून २८ तारखेपर्यंत विविध कार्यक्रम ऑनलाईन घेतले जाणार आहेत. त्यामध्ये कवी संमेलन, प्रश्नमंजुषा, कथा कथन, मान्यवरांचे कवी संमेलन या कार्यक्रमांचा समावेश आहे. २८ जानेवारीला किरण येले यांचे पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया या विषयावर समारोपीय व्याख्यान होईल. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभागपमुख प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभागप्रमुख प्रा.सुनील कुळकर्णी यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.
———————







