जळगाव;- भादली ग्रा.प मध्ये अंजली जान यांच्या विजयाने महाराष्ट्र राजकीय परिधान तसेच सामाजिक बदलाचे मार्ग खुले झाले असून तृतीयपंथीसाठी लोकशाही व समतेचा पथ प्रशस्त झाला आहे.
जळगाव जिल्हायात गोदावरी फॉउंडेशन संचलित टी आय सी सी केंद्रामार्फेत तृतीयपंथी समुदायाचे प्रबोधन तसेच इतर प्रश्नावर काम केले जात आहे. याच केंद्राचा भाग म्हणून गेल्या काही वर्षापुर्वी मुख्य प्रवाहात आलेल्या अंजली जान हिचा भादली ग्रा.प मध्ये विजय निश्चीत झाला. यानिमीत्ताने अंजली यांचा छोटेखानी सत्कार जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, प्रकल्प अधिकारी विरेंद्र दुबे,डॉ राजू पाटील, डॉ. दिलीप ढेकळे, विश्वनाथ कोळी, निलेश पाटील, नंदु धनगर, दिनेश डाकवे, आदिल पाटील, निलेश कोळी, यांचे हस्ते करण्यात आला यावेळी इतर समुदाय सदस्य व संस्था कर्मचारी उपस्थीत होते.
माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गेली १०/१२ वर्षापासून जळगाव जिल्हयात तृतीयपंथी समुदायात जनजागृती व अधिकार व नेतृत्व गुण जाणून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अविरत सूरू आहे.याचाच एक भाग म्हणून गोदावरी फॉउंडेशन सदस्य म्हणून अंजली जान या गेली अनेक वर्ष आरोग्य सेवेचे कार्य करीत आहे. मागील निवडणूकीत थोडक्यात पराभव झाल्यावर डॉ. उल्हास पाटील यांनी धिर देत उत्साह वाढवला होता तसेच या निवडणूकीत मार्गदर्शनही केले.त्यामूळे त्यांचे आभार अंजली यांनी मानले.








