पाचोरा ;- आज दि. 20 रोजी ऑनलाईन Zoom ऍपद्वारे म.तहसिलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा नगर परिषद विषय समितींच्या सभापतींची निवड करण्यात आली असुन पुढील विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत केले. यावेळेस पुढील प्रमाणे ऑनलाईन सदस्य उपस्थित होते. त्यात म.नगराध्यक्ष . संजय गोहील नगरसेवकांमध्ये, अशोक मोरे, बशिर बागवान, हाजराबी तडवी, मालती बापु हटकर, हर्षाली दत्तात्रय जडे, वासुदेव भिवसन माळी, रफिक बागवान, संगिता आनंदा पगारे, वाल्मिक पाटील, विकास पाटील, खान सईदाबी, राम केसवाणी आदी नगरसेवक तसेच मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सभा लिपीक, राजेंद्र शिंपी, मंगेश माने, ललित सोनार, किशोर मराठे, आकाश खैरनार आदी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच दिनांक 05/01/2021 रोजी झालेल्या विशेष सभेनुसार स्थायी समिती सदस्य म्हणून अनुक्रमे
(1) पाटील सुनिता किशोर
(2) वाघ संजय ओंकार
(3) धमेंद्र उत्तम चौधरी
यांची निवड करण्यात आलेली आहे.

निवड झालेले सभापती
(1) नियोजन व विकास समिती- शरद बाळकृष्ण1 पाटे (पदसिध्दक सभापती)
(2) सार्वजनीक बांधकाम समिती – वासुदेव भिवसन माळी
(3) शिक्षण,क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती- रफिक गफ्फार बागवान
(4) स्वच्छता,वैद्यक आणी सार्व.आरोग्य समिती – मालती बापु हटकर
(5) पाणीपुरवठा आणि जलनिसा:रण समिती- श्री. विकास संतोष पाटील
(6) महिला व बालकल्याण समिती – संगिता आनंदा पगारे
वरील प्रमाणे समित्यांचे सभापती म्हणुन बिनविरोध निवडुन आल्याचे तहसिलदार यांनी जाहीर केले.
मुख्याकधिकारी
पाचोरा नगरपरिषद पाचोरा







