जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरात बुधवारी महापौर भरती सोनवणे यांनी मुख्य गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सोमवारपासून महास्वच्छता अभियान सुरू केले आहे. बुधवारी एसएमआयटी कॉलेज रस्त्यावर पाहणी करताना मुख्य गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून मनपा अधिकारी गुणवत्ता तपासत नसल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली








