पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ५८ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा-रिंगणगाव रस्त्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षकांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास येथे छापा मारला.

या कारवाईत १२ जणांना अटक करण्यात आली असून यात जळगावातील काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे परिविक्षाधीन डीवायएसपी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यातील संशयितांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.रोहिणी हॉटेलच्या पाठीमागे टाकलेल्या धाडीत ५८ हजार रुपये जप्त करण्यात आले असून वाहने देखील जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी नुरा गुलाम पटेल, निसार शहा मस्तानी शहा, समाधान अर्जुन माळी, विक्रम श्रीराम सपकाळे, मनोज बाविस्कर, अमोल रामकृष्ण सपकाळे,रवींद्र शोभणे, नारायण रामचंद्र पाटील, किरण पिंजारी, योगेश पिंजारी, राजेंद्र चौधरी, विलास सुधाकर माळी, मुकेश महाजन, राजू जगन्नाथ बडगुजर, प्रकाश कोळी, कुणाल कोळी, नदीम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.







