नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीन, रुस, अरब, सीरियासारखे देश दावा करत आहेत की, कोरोना व्हायरसमागे अमेरिकेचा डाव आहे? तर अमेरिका आणि इजराइल आरोप लावत आहेत की, हे जैविक हत्यार आहे. म्हणजेच बायो वेपन चीनच्या लॅबमध्ये तयार झाले आहे. ज्या वुहान शहरातून कोविड-19 व्हायरस संपूर्ण जगभरात पसरल्याचे बोलले जात आहे. त्याच शहरामध्ये चीनचे इस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी नॅशनल बायोस्प्टी लॅब आहे. ही प्रयोगशाला हुनान सी-फूड मार्केटपासून फक्त 32 किलोमीटर अंतरावर आहे. या सी-फूड मार्केटमधूनच हे व्हायरस जगभरात पसरण्याचा दावा करण्यात येत आहे.चीनच्या या लॅबमध्ये इबोला, निपाह, सॉर्स आणि दूसऱ्या घातक व्हायरसवर रिसर्च केले जाते. येथील लॅबमध्ये वैज्ञानिकांनी मायक्रोस्कोपमध्ये एक विचित्र व्हायरस पाहिला होता. असा व्हायरस यापूर्वी कधीही दिसला नाही. याचे जेनेटिक सिक्वेंस निरखून पाहिल्यानंतर ते वटवाघूळमध्ये असणाऱ्या व्हायरसप्रमाणे आहेत असा अंदाज आहे. या व्हायरसमध्ये आणि सार्स व्हायरसमध्ये समानता असल्यामुळे वैज्ञानिक हैराण होते. सार्समुळे 2002 आणि 2003 मध्ये चीनसोबतच जगभरातील लाखो लोक आजारी पडले होते. जगभरात 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. सार्स हा आजार स्पर्शाने आणि संक्रमित व्यक्तीने शिंकल्याने किंवा खोकल्याने पसरू शकतो असेही यावेळी सांगण्यात आले होते.चीनने हा व्हायरस आतापर्यंत लपवला होता असा आरोप चीनवर केला जात आहे. तसेच कोरोना व्हायरस याच लॅबमधून लीक झाला असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. कोरोना संक्रमण वुहानमधून सुरू झाले हा योगायोग नसू शकतो असे इजराइलने म्हटले आहे. येथे वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी नावाची प्रयोगशाला आहे. येथे सैन्यासोबत मिळून हानिकारक व्हायरसचा शोध घेतला जातो. असा दावा डेली मेल आणि वॉशिंगटन टाइम्स मीडिया संस्थाननेही केला आहे. दावा केल्यानुसार कोरोना व्हायरस चीनच्या जैविक युद्ध प्रोग्राम म्हणजेच बायो वॉरफेअर प्रोग्रामचा भाग होता. अमेरिकी सीनेटर टॉम कॉटनने शंका उपस्थित करत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस चीनचे हत्यार असू शकते. हे वुहान लॅबमध्ये विकसित केलेले असू शकते. तर चीन आणि रुस सारखे देश अमेरिकेवर प्रश्न उपस्थित करत आहे. कोरोना व्हायरस अमेरिकेच्या ट्रेड वॉरचा भाग असल्याचेही म्हटले जात आहे.रुसने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस अमेरिकेचे एक जैविक हत्यार आहे. चीनची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने हे हत्यार उपसले आहे असा आरोप रुसने केला आहे. 1980 च्या शीत युद्धाच्या काळात रुसने HIV साठीही अमेरिकेलाच जबाबदार धरले होते. अशावेळी खरंच अमेरिकनेने चीनच्या विरोधात हे हत्या उपसले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चीन – अमेरिका कोरोना कोणाचे हत्यार?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) -चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीन, रुस, अरब, सीरियासारखे देश दावा करत आहेत की, कोरोना व्हायरसमागे अमेरिकेचा डाव आहे? तर अमेरिका आणि इजराइल आरोप लावत आहेत की, हे जैविक हत्यार आहे. म्हणजेच बायो वेपन चीनच्या लॅबमध्ये तयार झाले आहे. ज्या वुहान शहरातून कोविड-19 व्हायरस संपूर्ण जगभरात पसरल्याचे बोलले जात आहे. त्याच शहरामध्ये चीनचे इस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी नॅशनल बायोस्प्टी लॅब आहे. ही प्रयोगशाला हुनान सी-फूड मार्केटपासून फक्त 32 किलोमीटर अंतरावर आहे. या सी-फूड मार्केटमधूनच हे व्हायरस जगभरात पसरण्याचा दावा करण्यात येत आहे.चीनच्या या लॅबमध्ये इबोला, निपाह, सॉर्स आणि दूसऱ्या घातक व्हायरसवर रिसर्च केले जाते. येथील लॅबमध्ये वैज्ञानिकांनी मायक्रोस्कोपमध्ये एक विचित्र व्हायरस पाहिला होता. असा व्हायरस यापूर्वी कधीही दिसला नाही. याचे जेनेटिक सिक्वेंस निरखून पाहिल्यानंतर ते वटवाघूळमध्ये असणाऱ्या व्हायरसप्रमाणे आहेत असा अंदाज आहे. या व्हायरसमध्ये आणि सार्स व्हायरसमध्ये समानता असल्यामुळे वैज्ञानिक हैराण होते. सार्समुळे 2002 आणि 2003 मध्ये चीनसोबतच जगभरातील लाखो लोक आजारी पडले होते. जगभरात 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. सार्स हा आजार स्पर्शाने आणि संक्रमित व्यक्तीने शिंकल्याने किंवा खोकल्याने पसरू शकतो असेही यावेळी सांगण्यात आले होते.चीनने हा व्हायरस आतापर्यंत लपवला होता असा आरोप चीनवर केला जात आहे. तसेच कोरोना व्हायरस याच लॅबमधून लीक झाला असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. कोरोना संक्रमण वुहानमधून सुरू झाले हा योगायोग नसू शकतो असे इजराइलने म्हटले आहे. येथे वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी नावाची प्रयोगशाला आहे. येथे सैन्यासोबत मिळून हानिकारक व्हायरसचा शोध घेतला जातो. असा दावा डेली मेल आणि वॉशिंगटन टाइम्स मीडिया संस्थाननेही केला आहे. दावा केल्यानुसार कोरोना व्हायरस चीनच्या जैविक युद्ध प्रोग्राम म्हणजेच बायो वॉरफेअर प्रोग्रामचा भाग होता. अमेरिकी सीनेटर टॉम कॉटनने शंका उपस्थित करत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस चीनचे हत्यार असू शकते. हे वुहान लॅबमध्ये विकसित केलेले असू शकते. तर चीन आणि रुस सारखे देश अमेरिकेवर प्रश्न उपस्थित करत आहे. कोरोना व्हायरस अमेरिकेच्या ट्रेड वॉरचा भाग असल्याचेही म्हटले जात आहे.रुसने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस अमेरिकेचे एक जैविक हत्यार आहे. चीनची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने हे हत्यार उपसले आहे असा आरोप रुसने केला आहे. 1980 च्या शीत युद्धाच्या काळात रुसने HIV साठीही अमेरिकेलाच जबाबदार धरले होते. अशावेळी खरंच अमेरिकनेने चीनच्या विरोधात हे हत्या उपसले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.