जळगाव प्रतिनिधी;- येथील इच्छादेवी मंदिरामागील पंचशील नगरातील एका घरातील सर्व जण झोपलेले असतांना याचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयांनी अलगद २२ हजार रुपयांचे दोन मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , इच्छादेवी मंदीराच्या परिसरातील पंचशिल नगरात राहणारे रूक्साना राजू तडवी (वय-२८) रा.वडगाव ता. रावेर या शिक्षण घेतात. त्या नातेवाईकांसोबत राहतात. १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जेवण करून सर्वजण झोपले. मध्यारात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा लोटून १५ हजार रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि न्याजोद्दिन तडवी यांचा ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला अज्ञात चोरट्यांनी लांबविला. दोन मोबाईल चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी रूक्साना तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे करीत आहे.







