जळगाव प्रतिनिधी ;- तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतकऱ्याची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. नशिराबाद पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यातील भादली बुद्रुक येथील विजय ओंकार नारखेडे (वय-५२) हे शेतीचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी (क्रमांक एमएच – १९, बीआर ०५८८) आहे. नेहमीप्रमाणे १५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी आढळून आली नाही. विजय नारखेडे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.








