जळगाव प्रतिनिधी ;- उभा असलेल्या तरुणाच्या खिशात बळजबरीने हात घालत मोबाईल हिसकावून दोन भामट्यानी मोबाईल लंपास करून पलायन केल्याची घटना शनिवारी सायंकाळी भाऊंचे उद्यान येथे घडली . याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , विकास सैय्यद जब्बार सैय्यद (वय-३०) रा. रूबी अपार्टमेंट, डी-मार्ट समोर हा शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मुलांना घेवून भाऊंचे उद्यानात नाना नानी पार्कमध्ये घेवून गेले. बराच वेळ झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेअसता उद्यानासमोर दुकानावर शेंगदाणे व फुटाणे घेण्यासाठी रात्री ९.३० वाजेला थांबले होते. त्याचेवळी दुचाकीवर अज्ञात दोन जणांनी येवून त्यांच्या खिश्यातील ५ हजार रूपयं किंमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून विकास सैय्यद यांना ढकलून दिले. विकास सैय्यद यांनी आरडाओरड केली . मात्र दोन्ही भामटे दुचाकीवरून महाबळकडे पसार झाले . याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत होते.
————————————————–







