जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथे आज दि. १७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३०वा.श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान तालुका कार्यालयचे उद्घाटनमोठ्या उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर) , )ह.भ.प.भागवत महाराज (शिरसोली) , चंद्रशेखर महाराज (शिरसोली)
उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे जिल्हा सेवाप्रमुख नंदलाल काटोले यांनी केले विषय मांडणी श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व समारोप तालुका संघचालक डाॅ.भोजराज। सावंत यांनी केला.
कार्यक्रमास शिरसोली येथील सर्व श्रीराम भक्त व तालुक्यातुन रवींद्र महाजन,मुकेश कोळी,दीपक कासार,हेमंत भांडारकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी साठी शिरसोली उपखंड संदीप पाटील, विकास काळे,धनराज ताडे, भूषण काटोले,प्रदीप वराडे, काटोले,आकाश तायडे,भागवत बारी,अमोल काटोले,महेंद्र बारी,शुभम पवार,दीपक काटोले.यांनी परिश्रम घेतले.







