जळगाव ;- रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे रिमांड होममधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे आणि अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष डॉ. रेखा महाजन, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे, आनंद खांबेटे, डॉ. सुमन लोढा, दिलीप गांधी, डॉ. उषा शर्मा, श्रीरंग पाटील, शंकरलाल पटेल, डॉ. विवेक वडजीकर, कॅप्टन मोहन कुळकर्णी, संजय बारी, तारीक शेख, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, सुनंदा देशमुख, अनिता सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मिडटाऊनचे माजी अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हस्य उमटले होते.








