मुंबई (वृत्तसंस्था) – बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असताना भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरी, जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणु शर्माविरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आश्चर्यकारक कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे आता रेणू शर्माने माघार घेतली आहे. तिने ट्विट करत याबाबत सांगितले आहे.

रेणू शर्माने ट्विट केले आहे की, ‘या प्रकरणात मी माघार घेते हीच तुमच्या सर्वांची इच्छा आहे. माझ्याबाबत सर्व मिळून जे आरोप करत आहे ते चुकीचे आहेत. माझ्यावर जे आरोप केले जात आहे ते यापूर्वी का करीत नव्हते. मी माघार घेत असले तरी मला माझा गर्व आहे. तुम्हाला माझ्या बद्दल कितीही आरोप करायचे आहे करा असं म्हणत रेणू शर्माने देव तुमचं भलं करो अशा आशयाचे ट्विट केले आहे.







