जळगाव : 15 हजारांची लाच मागणार्या जवखेडा, ता.अमळनेर येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (44, रा.प्लॉट नं.54, सुर्या नगर, नकाणेे रोड, आधार नगरजवळ, धुळे) यांना बुधवारी दुपारी 12.30 वाजता जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. आरोपीला गुरुवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यास 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.








