मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तसंच खुलाशानंतर काही सवाल उपस्थित होत आहे. “तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?”, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या गायक महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसंच पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या वाघ यांनी केली आहे.







