नाशिक (वृत्तसंस्था) – नाशिकमध्ये गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिमध्ये एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधली ही घटना आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मृत तरुणी ही काल आपल्या मित्रासोबत लॉजवर आली होती. त्यानंतर आज सकाळी तरुणीचा खोलीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीस तपसा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकणातील मृत तरुणी ही नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून मुलीच्या मित्रालाही ताब्यात घेतलं आहे.
पोलीस सध्या तरुणाची चौकशी करत असून त्याच्याकडून नेमकं काय झालं याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस तरुणीच्या कुटुंबियांची आणि तिच्या मैत्रिणींचीही या प्रकरणात चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.







