मुक्ताईनगर : – भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई चरणी पाद्यपूजा आरती करून दर्शन घेतले. जळगाव येथे मंगळवारी कामानिमित्त आलो असता संत मुक्ताबाई दर्शनाची आस लागल्याने बुधवारी सकाळी मुक्ताई समाधीस्थळावर आलो. वारकरी संताच्या विचारांची समाजाला आज नितांत गरज आहे. संत मुक्ताबाई दर्शनाने मिळालेली ऊर्जा मानसिक प्रेरणा देते, असे भावोत्कट विचार मांडले.संत मुक्ताबाई मंदिर समाधीस्थळाचे बांधकाम व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. संस्थानच्या वतीने व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, पुजारी विनायकराव व्यवहारे यांनी माधव भंडारी यांचा शाल, श्रीफळ, मुक्ताबाई प्रतिमा, ग्रंथ देवून सन्मान केला. यावेळी खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओचे डाॅ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, चंद्रकांत भोलाने उपस्थित होते.








