जामनेर;-येथील वडिकील्ला घाटाजवळ चारचाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात अंत्यसंस्कारासाठी जाणार्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १३ बुधवार रोजी सकाळी घडली . तर इतर तीन जण जखमी झाले. अबेदाबी शेख इसाक (५५, रा.अकोला) असे या ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
जामिल्खान नावाजखान (५५), शेख सुभान शेख मेहबूब (५८) व जाहिदाबी अब्रार अहमद (सर्व रा. अकोला) अशी जखमींची नावे आहे. अपघातची माहिती मिळताच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले.








