नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलिसही विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना काठीचा प्रसाद देत आहे. मात्र, नागरिक काही ऐकण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पोलिसही आता अनोख्या आयडिया लढवताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने ‘जिंदगी मौत ना बन जाए.’ या गाण्यातून जनजागृती केली होती. या व्हिडिओला नेटकऱ्यांनीही चांगली दाद दिली होती. अशाच एका अनोख्या रितीने पोलिसांनी टवाळखोरांना अद्दल घडवली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांची पोलिसांनी चक्क आरतीचं केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या व्हिडिओला अजय देवगणच्या विजयपथ चित्रपटातील ‘आइए आपका इंतजार था’ हे गाणे जोडले आहे.