जळगाव;- शहरातील जोशींपेठ भागात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने कपातून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, कोकीळा लक्ष्मण महाले (वय-६०) रा. जोशी पेठ भोई गल्ली या आई वृध्द आईसह राहतात. ६ जोवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगावातील देवीदास कॉलनीत राहणारी बहिण कल्पना बोरसे यांच्याकडे कोकीळा महाले ह्या आईसह गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कूलूप कापून घरातील वडीलोपार्जिंत तिजोरीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड लांबविले. व घरातील संपूर्ण सामान अस्तव्यस्त केले होते. दुसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे रंजना महाले यांनी कोकीळा महाले यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे कळविले. कोकीळा महाले यांनी तत्काळ घरी येवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले. शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघूनाथ महाजन करीत आहे.








