पारोळा;-येथे लग्नासाठी आलेल्या व्यक्तीची कार अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना ६ रोजी घडली असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जगमोहनदास नगर येथील मित्राच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे शिरपूर येथील जितेश उध्दवदास खेमाने (वय-३७) हे कारने आपल्या कुटुंबियांसह ५ जानेवारी रोजी सकाळी आले होते. रात्री १० वाजता मित्राच्या घरासमोर कार (एमएएच १८ बीस ८२२२) पार्किंग करून लावली होती. मात्र ती कार अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आल्यांनतर जितेश खेमानी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील करीत आहे.







