चाळीसगाव – संसर्गजन्य कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत या संकटकालीन स्थितीत रक्तपुरवठ्यात घट होत आहे. अशात गरजूंना रक्त लागल्यास यंत्रणेपुढे वेगळाच प्रश्न निर्माण होऊ शकेल हे लक्षात घेऊन येथील रयत सेनेच्या वतीने शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी ३ वाजता व दि २९ रोजी दोन दिवस शहरातील जीवन सुरभी ब्लड बॅंकेत रक्तदान शिबिर घेतले
रयत सेना नेहमी जनतेच्या हितासाठी अनेक आपत्कालीन स्थितीत अग्रेसर राहुन सेवा पुरविण्यास कटीबद्ध असते सध्या कोरोनामुळे निर्माण झालेला संकटकालीन स्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे या स्थितीत राज्य सरकार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले त्यास रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी प्रतिसाद देत रयत सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले त्यास प्रतिसाद दिला असून गर्दी न करता टप्प्याटप्प्याने दात्याने रक्तदान केले शिवाजी पवार,सतीश पवार,विनोद पवार,अमोल पवार,रविन्द्र गोसावी, ,योगेश पाटील,अमोल सोनार ,रविन्द्र जाधव ,अमोल देठे ,जितेंद्र पवार, दत्ता पवार ,ज्ञानेश्वर कोल्हे यांनी रक्तदान केले असुन यापुढेही दोन दिवस रक्तदान शिबिरात जवळपास १०० च्या वर रक्तदान करण्याचा माणस असल्याचे रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी सांगितलें या शिबिरात जीवन सुरभी ब्लड बॅंकेचे डॉ दत्ता भदाणे ,असिफ खान ,हरीश बुरुकुल आदि चे सहकार्य लाभले