अमळनेर;– येथील महाराष्ट्र पत्रकार संघ चे राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर मेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरपत्रकारांना विशेष पॅकेज व पोलीसांकडून वृतांकण करताना मारहाण व अडवणूक बाबत पत्र पाठविले.
सदर पत्रात त्यांनी खालील बाबी लक्षात आणून देतांना सांगितले की, राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु होताच आपण घेतलेल्या लॉकडाऊनचा स्तुत्य निर्णय घेतलात.त्याबद्दल आपले सर्वप्रथम पत्रकार बांधवांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन!. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून अाम्ही आपल्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
पोलीस,डॉक्टर व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.हे काम करीत असताना काही ठिकाणी पत्रकार बंधूंनाही पोलीसांनी मारहाण केली.तेंव्हा ओळखपत्र असणा-या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण अथवा अडवणूक करु नये अशी मागणी आहे. तसेच अनेक पत्रकारांना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल चा पुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आज केला.