पारोळा – तालुक्यातील सर्वात जास्त मताधिक्य असलेली तसेच सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी वसंतनगर तांडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडावी असे प्रयत्न आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व ग्रामस्थांकडून चालू होते त्याला आज सुमारे १०० ते १५० वर्षा नंंतर वसंंतनगर तांडा ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. म्हणून वसंतनगर गावाचे तसेच ग्रामस्थांचे पारोळा तालुक्यात सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. ग्रामस्थांच्या मतेे तर हा एक इतिहास रचला गेल्याचे साांगण्यात येत असून कधी एक न होणार्या तसेच अटीतटीची व चुरशीची निवडणूक लढविणारा हा गाव बिनविरोध निवड करेल असे कोणालाच वाटत नव्हते परंतु हे शक्य झाले तर ते वसंतनगर येथील गटविकास अधिकारी मा.सुुुभाष जाधव साहेब,अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.कांतीलाल नायक, ताराचंद जाधव, छगन जाधव परशराम जाधव आलम जाधव दरबार जाधव सिताराम जाधव भिभीषण जाधव किसन जाधव करणसिंग जाधव परमा जाधव हिरामण जाधव चंद्रसिंह जाधव रघुनाथ जाधव हंसराज जाधव निंबा जाधव गणेश जाधव, पोलिस पाटील विलास जाधव, पांडुरंग जाधव, आलम जाधव, आनार जाधव, एकनाथ बंकट जाधव, अशोक जाधव, रवि भाऊ, मनोज भाऊ, रमेश जाधव, राजू जाधव, शाम जाधव, केळकर जाधव, आत्माराम जाधव, प्रकाश जाधव, चेतन जाधव, मनोहर जाधव, अविनाश भाऊ जाधव जितेंद्र जाधव, तुषार पवार, एकनाथ जाधव, रतिलाल जाधव, विजय जाधव, बाबुलाल जाधव, शालिक जाधव, लक्ष्मण जाधव, मुलचंद जाधव, तसेच इतर सदस्यांनी केलेल्या अक्षम्य प्रयत्नामुळे सदर गाव बिनविरोध निवडून आले आहे. खर तर वसंतनगर तांडा हा लोकसंख्येच्या प्रमाणात पारोळा तालुक्यातील सर्वात मोठा आणि सर्व बंजारा समाज असलेला गाव आहे. या गावात संपूर्ण जाधव परिवार आहे. म्हणून याला एका म्हात्याराचे गावही म्हटले जाते, या गावात चार वार्ड असून आकरा सदस्यांची बाँडी आहे. या पंच वार्षिक निवडणुकीसाठी सदर गावातून ३४ नामनिर्देशन अर्ज करण्यात आले होते, यात पॅनल एक कडुन १२ अर्ज तर पॅनल दोन कडून १३ तसेच तिसरी आघाडी कडून ८ असे ३३ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले, शेवटच्या दिवशी म्हणजे आज यामधून फक्त ११ अर्ज सोडून बाकी सर्व माघार घेतल्याने तसेच गावाचे व भाऊबंधकीचे एक मत झाल्याने वसंतनगर तांडा ग्रामपंचायत बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेले वार्ड वाईज मेंबर ते खालील प्रमाणे
वार्ड क्रमांक एक – १. विद्याबाई राजाराम जाधव, २. रतिलाल नंदलाल जाधव, ३. साळुंकाबाई आलमसिंग जाधव,
वार्ड क्रमांक दोन – १.कौशल्याबाई पांडुरंग जाधव, २.नबिबाई दरबार जाधव, ३. दिपक बाबुलाल जाधव,
वार्ड क्रमांक तीन – १.आरती सुभाष जाधव, २. सुदाम सुुुुरुपचंद जाधव तर
वार्ड क्रमांक चार – १.केळकर पद्ममसिंग जाधव, २. दुर्गाबाई शाम जाधव, ३. लताबाई आत्माराम जाधव
यांना बिनविरोध निवडण्यात आले असून गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी या सर्वांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी या सर्वांना ग्रामस्थांनी आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या असून त्यांना सहकार्य मा. सुभाष जाधव सर, मा. कांतीलाल नायक तसेच मा. गणेश जाधव यांनी करण्याचे राष्ट्रीय अध्यक्षआश्वासन दिले आहे.







