


जामनेर (प्रतिनिधी) – येथे आज साप्ताहिक केसरीराज दिनदर्शिकाचे लोकार्पण सोहळा माजी मंत्री, आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन, उपनगराध्यक्ष श्री.शरद पाटील सर, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, तहसीलदार अरुण शेवाळे, नगरसेविका ज्योतीताई पाटील, संध्याताई पाटील आदी सर्व नगरसेवक व केसरीराजचे तालुका प्रतिनिधी गजानन तायडे, जामनेर शहर प्रतिनिधी देविदास विसपुते उपस्थित होते. यावेळी केसरीराजच्या या सुबक आणि आकर्षक दिनदर्शिकेचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.







