जळगाव (प्रतिनिधी) – मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाश मान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज रोजी राष्ट्रीय हिंदु सुरक्षा सेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘मुली वाचवा’ देश वाचवा’
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’
‘बेटी है तो कल है’
अशी घोषणा देत आई सावित्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले राष्ट्रीय हिंदु सुरक्षा सेनेच्या वतीने राजे इन्फो, रथ चौक येथे जयंती साजरी करण्यात आली. पुष्पहार अर्पण करताना जळगाव येथील स्वप्न साकार फाउंडेशन संचालिका सौ. भारतीताई काळे, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन सौ. अर्चना ताई सूर्यवंशी, कु. मयुरी ताई लांजुळकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संचालक हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे राकेश भाऊ कांडारे, झोन व्हाईस प्रेसिडेंट जे सी आय इंडियाचे जिनल भाऊ जैन, राष्ट्रीय हिंदु सुरक्षा सेना चे जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ बारी, जिल्हा उपाध्यक्ष विवेक भाऊ महाजन, सचिव प्रदीप सोनार, प्रसिद्धीप्रमुख अमित अग्रवाल, जनसंपर्क प्रमुख रोहित शर्मा, सोशल मीडिया प्रमुख निलेश वाणी , उपप्रमुख हेमंत सोनार, कुलदीप बुवा , ज्ञानेश्वर भालेराव, ललित शिंपी आदी उपस्थित होते.







