जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील स्वर्गीय शिवसैनिक श्याम कुमार पांढरे यांच्या 20 वा स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर काढलात अभिवादन करण्यात आले.
येथील स्थानिक शिवसेना नेते तथा पत्रकार गणेश पांढरे यांचे धाकटे बंधू स्वर्गीय शिवसैनिक श्याम कुमार पांढरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर शिवसेना कार्यालयात श्याम कुमार पांढरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन उद्योगपती तथा माजी शहर प्रमुख शिवसेना सुकलाल बारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजदार पांढरे कैलासवासी शामकुमार पांढरे यांच्या कार्याचा आठवण करून दिली. यावेळी शेंदुर्णी शहर प्रमुख विलास पाटील सुकलाल बारी, माजी जिल्हाध्यक्ष राजधर पांढरे, मानव अधिकार उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख संतोष पाटील, शांताराम गोंधनखेडे, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे, तालुका उपसंघटक रवींद्र पांढरे, शेतकरी सेना संघटक भाऊराव गोंधन खेडे, शिवदास जाधव विजय पांढरे, विजय बारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









