राष्ट्रीय युवक कॉंग्रेसची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदीत विना नोंद घट लावणाऱ्या सीसीआय व पणन अधिकारी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात मार्फत गुन्हा दाखल करावे अशी मागणी राष्ट्रीय युवक काँग्रेस निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सीसीआय व पणन महासंघाकडून कापूस खरेदी सुरू आहे. कापूस खरेदीत सीसीआय व पणन अधिकारी, कर्मचारी कापूस मापन करताना कवडी कापूस म्हणून वजन पावतीवर कुठेही नोंद न करता एक किलो पासून ते सात किलो पर्यंत प्रत्येक 100 किलो मागे घट करतात. शासकीय कापूस मोजणीत या गोष्टीची कुठेही नोंद होत नाही. कापूस मोजणीत शासकीय लोक सेवकाने मोजताना कुठेही नोंद न करता एक ते सात किलो कापूस हि लाच असून भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हा आहे, असे म्हटले आहे.
निवेदन देतांना जळगाव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष व युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता अंबादास गोसावी अधिकारी उपस्थित होते







