मुंबई (वृत्तसंस्था) – २०२० वर्ष हे संपले असून नव्या आशेच्या किरणांनी २०२१ वर्ष सुरु झाले आहे. सर्वच जण नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावे अशी सदिच्छा संदेशांद्वारे पाठवत आहे. आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खास शैलीत कवितेद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवले यांची कविता
सरते 2020 वर्ष ठरले कोरोनाच्या भीतीचे
तरीही त्यात दिसले काही लोक हिंमतीचे
कोरोनायोद्धे हिंमतीने लढले
काही कोरोनामुळे धारातीर्थीपडले
मी ही दिला गो कोरोनाचा नारा त्या विरुद्ध लढण्यासाठी
जागा झाला भारत सारा कोरोना ला गाडण्यासाठी
कोरोनामुळे जात होते कित्येकांचे जीव
लॉकडाऊन मध्ये पंतप्रधान मोदी सरकार ने केली गरिबांची कीव
लॉक डाऊन करून वाचविले जीव
अन्नधान्य वाटून वाचले गरिबांचे जीव
येणाऱ्या वर्षात कोरोना संपून जावा
सन 2021चा उगवता सूर्य सर्वाना नवजीवन घेऊन यावा! नव्या वर्षात होऊ नये कुणाचाही कोरोनाशी सामना !
म्हणून मी देतो सर्वाना नव्या वर्षाच्या शुभकामना !
अशा शुभेच्छा रामदास आठवले यांनी कवितेद्वारे दिल्या आहेत.







