भाजपा गटनेते संजय रतनसिंग पाटील व शहर विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा कोळी यांच्यासह २० नगरसेवकांचे नगराध्यक्ष यांना अविश्वास ठरावासाठी पत्र…

चाळीसगाव (प्रतिनिधी) – नगरपरिषद उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उपाध्यक्ष आशाबाई रमेश चव्हाण ह्या उपाध्यक्ष झाल्याचे दिनांकापासून त्या स्वतः नगरपरिषदेचे कामकाजात कोणताही सहभाग नोंदवत नाहीत. त्याचप्रमाणे वारंवार विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतील अशा पद्धतीने नगरपरिषद व वरिष्ठ कार्यालयांकडे विकास कामांच्या संदर्भात खोट्या तक्रारी दाखल करून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करीत आहेत. त्यांना अशाच स्वरूपाचे कामकाजात स्वारस्य असल्याचे दिसून आलेले आहे.
त्या स्वतः नगरपरिषदेत कोणतेही काम न करता आपले पतीच्यामार्फत नगरपरिषदेच्या कामकाजात सातत्याने हस्तक्षेप करत असल्याने नगरपरिषद कामकाजात बेशिस्तीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. अशा परिस्थितीत त्यांना नगरपरिषद हिताच्या दृष्टीने उपाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नसल्याचे निवेदन चाळीसगाव नगरपरिषद भाजपाचे गटनेते संजय रतनसिंग पाटील व शहर विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा चिंधा कोळी यांच्यासह २० नगरसेवकांनी नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याकडे दिले आहे.
तसेच चाळीसगाव नगरपरिषद उपाध्यक्ष आशाबाई रमेश चव्हाण यांना पदावरून दूर करण्याकरिता विशेष सभेचे त्वरित आयोजन करण्यात यावे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
चाळीसगाव नगरपालिकेत निवेदन देताना यावेळी नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा गटनेते संजय रतनसिंग पाटील, शहर विकास आघाडीचे प्रवक्ते नगरसेवक अण्णा चिंधा कोळी, नगरसेविका यास्मिन बेग फकिरा बेग मिर्झा, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, शेखर बजाज, मानसिंग राजपूत, शेख चिरागुद्दीन शेख, सोमसिंग राजपूत, नितीन रमेश पाटील, अरुण मोतीलाल अहिरे, चंद्रकांत रामकृष्ण तायडे, झेलाबाई पुंडलिक पाटील, वत्सलाबाई महाले, विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पगार आदी उपस्थित होते.







