चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील भाजपा व समविचारी नगरसेवक, नगरसेविका यांची आमदार मंगेश चव्हाण यांनी अंत्योदय जनसेवा कार्यालयात बैठक घेतली. सध्या देशभर कोराना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनुसार व माजी पालकमंत्री आमदार गिरीषमहाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या आपत्तीच्या काळात भाजपचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी जास्तीतजास्त गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना आवश्यक मदत करण्याचे नियोजन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरात लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगार गेला आहे अशा गरजू नागरिकांना घरपोच जेवणाचे दररोज 1500 पॅकेट आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत उपलब्ध केले जाणार असून नगरसेवक, भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते वितरण केले जाईल सध्याची भीतीची परिस्थिती पाहता वैद्यकीय सेवेवर पडणारा ताण लक्षात घेत आ. मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात मोफत जनसेवा क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर व ग्रामीण भागात औषध फवारणीसाठी आ. मंगेश चव्हाण स्वखर्चातून 6 फवारणी यंत्र देणार असल्याची माहिती यावेळी शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी दिली.