मुंबई (वृत्तसंस्था) – पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलवले आहे.

ईडीने पाठविलेल्या नोटीस नंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ‘मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल.तर पाहून घेऊ,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ‘हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,’ असंही संजय राऊत यांना सांगितलं.







