अमळनेर (प्रतिनिधी) – दमण, दीवच्या मराठा सेवा संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी शिवश्री गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाच्या दमन , दिव च्या प्रदेश अध्यक्ष पदी शिवश्री गणेश साहेबराव पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली आहे .
शिवश्री गणेश पाटील हे मूळ इंद्रापिंप्री ता.अमळनेर येथील असून ते दीव दमण येथे 2005-6 पासून वास्तव्यास आहेत.गणेश पाटील हे दमण येथील एका कंपनीत कामाला होते.परंतु ते आता स्वतः एक व्यवसायिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान , संघटन कौशल्य , बौध्दीक चातुर्य , उपक्रमशीलता , नेतृत्व गुण पाहता दिव, दमनचे प्रभारी दिपक पाटील व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी त्यांची शिफारस केली होती. गणेश पाटील यांच्या नियुक्तीबद्दल विविध संघटना व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.