एरंडोल (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गैरसमज दूर करून एकोप्याने कामाला लागलावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केली. ते येथील शिवसेना कार्यालयातील बैठकीत बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकील आमदार चिमणराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचे नियोजन करा, पक्ष संघटन मजबूत करा, पक्षाला तडा जाईल असे कार्य करू नका. आपसातले राजकारण, समज-गैरसमज दूर करुन एकजुटीने कामाला लागून जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा फडकावा असे आवाहनही केले. तसेच फक्त एखादा वॉर्ड अविरोध झाला तरी त्या वॉर्डासाठी पाच लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा देखील आमदार पाटील यांनी केली.