पाचोरा ( प्रतिनिधी) – उत्तम कौतिक पाटील यांच्या गावालगत असलेल्या गट. नंबर- ९ मधे दि.२७ डिसेंबरच्या मध्यरात्री शेताच्या बांधावर बांधलेल्या एकूण चार ते पाच जनावरांच्या मधील एक पाच वार्षीय गाय व दिड वर्षीय वासरुवर हिंस्र प्राण्यांच्या हल्यात मयत अवस्थेत आढळून आले. या भागात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आलेले आहे. वन्य प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना झाडावर घेऊन गेल्याची ही घटना नवीनच असतांना गावालगत झालेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड घबराहट पसरली आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.