एरंडोल (प्रतिनिधी) – तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध करुन, निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा आमदार चिमणराव पाटील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आज आमदार चिमणरावजी पाटील अध्यक्षतेखाली एरंडोल तालुका शिवसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार चिमणरावजी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले कि, एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजु लोकांना शासनाचा योजनांचा लाभ मिळवुन देणेसाठी अहोरात्र झटा, ग्रामपंचायत निवडणुक पार्श्वभूमीवर लोकांचा समस्या जाणुन त्या त्वरीत किंवा भविष्यात मार्गी लावण्यासंबंधी नियोजन करा, पक्ष संघटन मजबुत करा, पक्षाला तडा जाईल असे कार्य करू नका तसेच यापुर्वी आमदार चिमणराव पाटील यांनी जी ग्रामपंचायत बिनविरोध निवड करेल त्याला २१ लक्ष रूपये देण्याचे जाहीर केले होते व याबैठकीत जरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसेल व त्या ग्रामपंचायतीतील एखादा वार्ड बिनविरोध झाला असेल तर बिनविरोध झालेल्या वार्डास प्रत्येकी ५ लक्ष रूपये निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले.
याप्रसंगी मुंबईहून खास आले विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्रजी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिवसेनेचा मुख्यमंत्री व आमदार, असल्याचा फायदा ग्रामपंचायतींना होणार आहे त्या दृष्टिकोनातून जास्त जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा तसेच महाविकास आघाडीला देखील सामावुन घ्या अशा सूचना केल्या पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, जळगांव जिल्हा महिला संघटक महानंदा पाटील, पं.स.उपसभापती अनिलभाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील शिवसेना तालुका समन्वयक निलेश पाटील उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, संजय पाटील नगरसेवक अतुलभाऊ महाजन, नगरसेवक चिंतामण पाटील, नगरसेवक राजेंद्र ठाकूर, पंचायत समिती माजी सभापती गबाजी पाटील, दत्तू पाटील बापू दशरथ पाटील, मार्केट कमिटी संचालक गजानन पाटील, कासोदा शहर प्रमुख महेश पांडे, अमोल भोई, रमेश जमादार, संदीप मराठे, आडगाव गण प्रमुख धनराज अहिरे, शहर प्रमुख रावसाहेब पाटील, उपसरपंच रवींद्र पवार धीरज पाटील, बंटी पाटील, श्याम कानडे, साहेबराव पाटी,ल उत्राण सरपंच संतोष कोळी, विनोद महाजन, राजेंद्र पाटील, हरीश पांडे, नारायण चौधरी, प्रदीप भालेराव, विलास महाजन, सुधीर पाटील, विनोद पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, गजानन पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, राजू वंजारी, गोविंद राठोड, रवी जोगी, बबलू वंजारी, शांताराम पाटील, प्रवीण पाटील, बाळासाहेब पाटील, शरद पाटील, परेश बिर्ला, अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, कृष्णा ओतारी, देवेन पाटील, राजेंद्र पाटील, वैजनाथ सरपंच नाना पाटील, कोडोली विलास पाटील, ज्ञानेश्वर कोळी, पिंपळकोठा ज्ञानेश्वर बडगुजर, साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिकन महाजन, शैलेश पांडे, भिकन बैरागी, नाना शिंदे, मुकुंदा पाटील, दिनेश पाटील, पंकज पाटील यासह तालुक्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना शहर प्रमुख अतुल महाजन, प्रास्ताविक तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केले.