जळगाव (प्रतिनिधी) – येथील हरिविठ्ठल नगर मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची घरासमोर लावलेली मोटारसायकल मध्यरात्री अज्ञात भामट्यांनी लांबविल्याची घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांकडून माहिती अशी की, भुषण बडगु सावंदे वय-२१ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव हा आयटीआयचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. त्याच्याकडे एमएच १९ डी.ई. ५७०५ क्रमांकाची मोटारसायकल आहे. २४ डिसेंबर रोजी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर होती. आज शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मोटारसायकल आढळून आली नाही. परिसरात शोधा शोध केली . मात्र मोटारसायकल मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात जाऊन . भुषण सावंदे यांनी रामानंदनगर पोलीसात अज्ञात भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.