नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना लस केव्हा येणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारतात कोरोनाची लस कधी येणार याची चर्चा देखील शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण अद्याप भारतात लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.

कोरोनाचे लसीकरण भारतात कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
जगभरातल्या 23 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीन, अमेरिका, रशिया आणि युकेत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताचा नंबर कधी लागणार मोदीजी असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे.







