जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर शहरातील शास्त्रीनगर भागातील रितेश भोई हा काल रात्री ३ वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी उठला.

तेव्हा त्याच्या लक्षात आले कि येथे गाडी कशी आली? त्यात काही तरी गैर प्रकार चालला आहे.त्याने लागलीच आरडा ओरड केला. तेव्हा शास्त्रीनगर भागातील तरुण जागे झाले.
त्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास पालवे,रविंद्र झाल्टे ,जितू काळे,विशाल भोई हे आवाज एकुण लगेच आले.ते वाहन क्र.एम.एच.२१ एक्स.४५८९ जवळ आले. तेव्हा त्यात गुरे कोंबलेली दिसली.गाई चोरणारे चोरटे व वाहन चालक गाडी सोडून फरार झाले.
गुरे चोरून नेणाऱ्या त्या काही चोरट्यांना शास्त्रीनगर भागातील तरुणांनी चांगलाच धडा शिकवला. अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.चोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी जनतेची मागणी आहे.सदर गुरे चोरणाऱ्या ना पकडण्यासाठी पुढील तपास जामनेर पोलीस करित आहेत.







