रोकडे येथे रयत सेना शाखा फलकाचे अनावरण

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील मूलभूत समस्या शासन प्रशासन स्तरावर लवकर मार्गी लागाव्यात यासाठी अठरा पगड जातींच्या बांधवांना सोबत घेऊन रोकडे गावातील नंदीवरील पुलाचा प्रश्न असो वा गावात एस टी सुरू होत नसल्याची समस्यासह रोकडे गावाला न्याय देण्याचे काम रयत सेनेच्या माध्यमातून करणार असल्याचे प्रतिपादन रोकडे रयत सेना शाखा फलकाच्या अनावरण प्रसंगी रयत सेना संस्थापक गणेश पवार यांनी केले.
तालुक्यातील रोकडे रयत सेना शाखा फलकाचे अनावरण रयत सेना संस्थापक गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष संजय कापसे हे होते. रयत सेना शाखा फलकाच्या अनावरण प्रसंगी बोलताना गणेश पवार म्हणाले की सामाजिक बांधीलकी जोपासत रयत सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या धान्य मालाला भाव मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले, अंध विद्यार्थ्यांना मोफत आधार कार्ड वाटप, महिला आरोग्य शिबिरात हालाखीची परीस्थिती असणाऱ्या गरीब महिला भगिनीचा मोफत टेस्ट रिपोर्ट काढण्यास आर्थिक मदत , गरीब विद्यार्थ्यांना शालेय फी भरण्यास आर्थिक मदत , विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी महिलांचा सन्मान,कला. क्रीडा साहित्य क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव,गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,राज्यमार्गाच्या अरुंद पुलाची रूंदी वाढवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन पुलाची निर्मिती होण्यासाठी कार्य, तरुणांना व्यायामाचे साहित्य घेण्यास आर्थिक मदत , ग्रामीण भागात वाचनालय निर्माण करण्यासाठी आर्थिक सहकार्य, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर नविन रेल्वे गाडयांचा थांबा ,कोरोना काळात गोरगरीबाना धान्य वाटप , मोफत सॅनेटायजर्स व मास्क वाटप,कोरोना काळात रक्ताचा तुटवड्यामुळे रक्तदान असे विविध जनकल्याणकारी कार्य रयत सेना समाजाचे देणे लागतो म्हणून करीत आहे . यापुढेही ग्रामीण भागातील विविध समस्या व प्रश्नांसाठी रयत सेना लढा देत राहणार असल्याचे सांगत विद्यार्थी करीयर मार्गदर्शन शिबिरे, गोर गरीबांना हिवाळ्यात ब्लॅंकेट वाटप .तसेच शेतकऱ्यांना धान्य मालाला हमीभाव मिळावा म्हणून रयत सेनेचे आंदोलन, यासह ग्रामीण भागात अनेक समस्या असून त्या तडीस नेण्यासाठी रयत सेना काम करेल शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी,महिलांच्या न्यायाकरीता संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहुन समाजहित जोपासत असते.सामाजिक चळवळीतुन जनहिताला प्राधान्य देवून रोकडे गावातील नंदीवरील पुलाचा प्रश्न असो वा गावात एस टी सुरू होत नसल्याची समस्या रयत सेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याचे याप्रसंगी गणेश पवार यांनी सांगितले.कार्यक्रमास जिल्हाअध्यक्ष संजय कापसे ,तालुका अध्यक्ष किशोर पाटील,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड, यावेळी
उपस्थित होते,
रोकडे रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील,उपाध्यक्ष लखन लोणे ,कार्याध्यक्ष संदिप मोरे , संघटक गोकुळ गायकवाड,सचिव ऋषीकेश पाटील, सहकार्याध्यक्ष सागर पाटील, सहसचिव भूषण शेलार , कोषाध्यक्ष राकेश पाटील ,प्रसिद्धी प्रमुख महेंद्र पवार ,समन्वयक सुनील पाटील यांच्यासह विभाग प्रमुख पदी अमोल पाटील यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी जाहीर केली.कार्यक्रमास पवन पाटील, गणेश पाटील,गोकुळ गायकवाड, समाधान पाटील, गणेश पाटील ,कुलदीप मोरे, आकाश पाटील, कल्पेश सोनवणे, चेतन पाटील, भगवान पाटील ,सतीश पाटील ,संदीप मोरे ,राहुल पाटील, अनिल पाटील, माधवराव पाटील, शरद भोईटे, पांडुरंग पवार ,दीपक पाटील ,हनुमंत भोईटे यांच्यासह रयत सेना कार्यकर्ते उपस्थित होते







