जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या कोरोना व्यतिरिक्त सेवांचा (नॉन कोविड) प्रारंभ गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निंभोरा ता. रावेर येथील रत्नाबाई एकनाथ भिल (वय ४०) यांना पहिला केसपेपर देऊन “ओपीडी” सुरू केली.

यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर.यु. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.संजय बनसोडे आदी उपस्थित होते.







