धुळे (वृत्तसंथा) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती धुळे व बागलाण तालुक्यातील आदर्श गाव टेंभे ग्रामपंचायत जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण मोहीम, पाणी आडवा, पाणी जिरवा, जलसंधारण तसेच एक गाव – एक होळी , प्रदूषणमुक्त दिवाळी, जलपरिषद , आदी अभियान यशस्वीपणे राबविणारे सन्माननीय कार्यकर्ते व यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून निसर्ग मित्र समिती व आदर्श गाव टेंभे ग्रामपंचायत तालुका बागलाण यांच्या सयुंक्त विद्यमाने २० डिसेंबर, रविवार रोजी सकाळी १२ वाजता मालेगाव येथील आयए सभागृह,एलआयसी कार्यालय जवळ, कँप रोड येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.